HOME   लातूर न्यूज

गुरूजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कमवा व शिका

अशी योजना सुरु करणारी जिल्ह्यातली पहिले खाजगी आयटीआय


गुरूजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कमवा व शिका

लातूर: श्री जानाई अभियांत्रीकी प्रतिष्ठान संचलित श्री गुरूजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जुनी एमआयडीसी लातूर येथे गरजू व होतकरू १० पास विद्यार्थ्यांना वेल्डर अभ्यासक्रमासाठी नुकताच कमवा व शिका योजनेचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेतील अत्याधुनिक वेल्डीग मशिनरीची पुजा श्री. गुरूजी आयटीआयचे कार्यकारी संचालक विजय सहदेव व भूषण दाते यांच्या हस्ते करून कमवा व शिका या योजनेची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्था अध्यक्ष अतुल ठोंबरे, सचिव संजय अयाचित, रवी मार्कंडेय, प्राचार्य विठ्ठल गाडेकर उपस्थित होते.
शासनाने ठरवून दिलेल्या प्रवेश शुल्कात ५० टक्के सवलत देवून या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकडून बांधकामातील लोखंडी खिडक्या, दरवाजे, डेस्क, टेबल, सर्व प्रकारचे ग्रील वर्क कमवा व शिका योजनेत तयार करून घेतले जाणार आहेत. अशी योजना सुरू करणारी लातूर जिल्ह्यातील श्री गुरूजी आय.टी.आय. ही एकमेव खाजगी आयटीआय ठरली आहे. कमवा व शिका ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रा. सुधाकर जोशी, सुनिल बोकील, महेश औरादे, वैभव कवठाळकर, हे विशेष प्रयत्न करीत आहेत. १० वी पास गरजू, होतकरू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री जानाई प्रतिष्ठान व श्री गुरूजी आयटीआय या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

Top