लातूर: औरादचे (जि. बिदर) तीन वेळा आमदार असलेले प्रभू चव्हाण यांची कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, माजी सभापती बापूराव राठोड, प्रा. पंडीत सूर्यवंशी यांनी बेंगलूर येथे सत्कार केला. शनिवारी बेंगलोर येथे चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचा शाल फेटा व फळांची कुंडी भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, माझ्या मंत्रिपदाचा उपयोग माझ्या औराद विधानसभा मतदारसंघातील व कर्नाटक राज्यातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी झाला पाहिजे. हे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन मी मेहनत करणार असून त्याचबरोबर महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या शेजारच्याच असलेल्या लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले असल्याची माहिती तिरुके यांनी दिली.
Comments