वैशालीनगर, निवळी: लातूर आणि परिसर दुष्काळाने होरपळून विदयमान युती सरकारने पाच वर्षात ऊजनीचे पाणी मांजरा धरणात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. पाण्या अभावी वाळणाऱ्या ऊसाचे साधे पंचनामेही केले नाहीत. कर्जमाफी केली नाही आणि सुशिक्षीत बेकारांना नोकरी ही दिली नाही त्यामुळे फक्त घोषणाबाजी करणाऱ्या भ्रष्टाचारी महायुतीच्या या सरकारला खाली खेचल्या शिवाय शेतकरी व सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले.
अत्यंत अल्पावधीत साखर उदयोगात आपल्या नावावर विविध विक्रम प्रस्थापीत करणाऱ्या लातूर तालुक्यातील वैशालीनगर निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची १७ वार्षिक सर्वसाधारण कारखानास्थळावर झाली़. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख होत्या़. यावेळी माजी आमदार वैजनाथराव शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख, विकासरत्न विलासराव देशमुख सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, गोकुळ माऊली शुगरचे चेअरमन व्ही़. पी़. पाटील, लातूर पंचायत समितीच्या सभापती शीतल फुटाणे, जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय देशमुख, जगदीश बावणे, ॲड़. विक्रम हिप्परकर यांची प्रमुख उपस्थिती होती़.
विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या आशिर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने विकास सहकारी साखर कारखाना दिमाखात उभा आहे, असे नमुद करुन आमदार अमित विलासराव देशमुख पुढे म्हणाले की, सन १९८० मध्ये विकासरत्न विलासराव देशमुख पहिल्यांदा आमदार झाले़ तेव्हा त्यांनी लातूरसारख्या दुष्काळी भागातील आमच्या शेतकऱ्यांसाठी काहींतरी करण्याचा प्रयत्न सुरु केला. साताऱ्यातील अभयसिंह राजेभोसले यांच्या अजिंक्यतारा साखर कारखान्याची प्रेरणा घेत साहेबानी चिंचोलीराव वाडीच्या माळरानावर मांजरा साखर कारखान्याची उभारणी केली. त्यांना स्व़. बी़.व्ही़ काळे, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खंबीर अशी साथ दिली़. आम्हा सर्वांना शेतकऱ्यांनीच घडवलेले असल्यामुळे साहेबांची प्रेरणा घेवून शेतकऱ्यांत आर्थिक प्रगती व्हावी, या उददेशाने साखर कारखानदारीत पुढचे पाऊल म्हणून विलास सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली़. त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा महायज्ञ सुरु झाला़ आज त्याला १७ वर्षे झाली आहेत. खरे तर साखर उदयोगानेच शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थक्रांती घडवली़. मांजरा परिवारातील साखर कारखान्यांचे मालक खऱ्या आर्थाने शेतकरीच आहेत. आम्ही विश्वस्त आहोत, असे नमूद करुन आमदार देशमुख पुढे म्हणाले की, विलास सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या बांधांवर घेऊन आलो आहोत़. सेंद्रीय शेती, सेंद्रीय ऊस, सेंद्रीय साखर हा पहिला प्रयोग विलास साखर कारखान्याने केला त्याची जगभर चर्चा होत आहे़. आगामी काळात ३६५ दिवस वीज निर्मिती, ३३० दिवस डिस्टीलरी कार्यान्वित ठेवणे, ईथेनॉलची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे, विकासरत्न विलासराव देशमुख यांचे कारखानास्थळावरील स्मारक आणि प्रशासकीय इमारतीचे काम वेगाने पूर्ण केले जाणार असल्याचेही आमदार देशमुख यांनी सांगितले़.
महाराष्ट्र सरकारच्या कारभाराचा समाचार घेत असताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी अत्यंत परखडपणे सरकारवर टिका .केली ते म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर, युवक आणि सर्वचजण दुष्काळाला तोंड देत असताना मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्या ऐवजी ते महाजनादेश यात्रा घेऊन फिरत आहेत. दुष्काळ निवारणासाठी सरकारने काय केले?, याचा जाब आता जनताच सरकारला विचारणार आहे़. कर्जमाफी दिल्याचे सरकारकडून सांगण्यात आले़ परंतू आत्महत्या केलेल्या लातूर तालुक्यातील रायवाडी येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या डोक्यावर अद्यापही कर्जाचे डोंगर आहेत. पाऊस नाही, पेरणी नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच काँग्रेस पक्षाने सरसकट कर्जमाफीची मागणी केलेली आहे़. ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत होता तेव्हा मुख्यमंत्री म्हणून विकासरत्न विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांना हेंक्टरी एक लाख रुपयांची मदत दिली होती, याची आठवणही त्यांनी करुन दिली़.
* विलास कारखान्याकडून युनीट १ च्या ऊस उत्पादकांना १०० रूपयाचा हप्ता जाहीर
* मराठवाड्याला कष्णेचे २५ टीएमसी पाणी मिळावे यासाठी सरकारने एक छदामही दिला नाही
* लातूरचे वैभव कायम राखण्यासाठी काँग्रेसच्याच लोकप्रतिनिधीला निवडून दयावे
* विकासरत्न विलासराव देशमुख यांची ७५ वी जयंती वर्षभर साजरी होणार
* शेतकरी सभासदांना ४० ऐवजी ५० किलो साखर सवलतीच्या दरात देणार
Comments