HOME   लातूर न्यूज

उबदार कपडे विक्रेत्यांनी घेतली आमदारांची भेट

व्यवसायात अडचणी आणल्या जात असल्याची तक्रार, आमदारांचे आश्वासन


उबदार कपडे विक्रेत्यांनी घेतली आमदारांची भेट

लातूर: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांची बाभळगाव येथे लातूर शहरातील उबदार कपडे (स्वेटर) विक्री व्यवसाय करणाऱ्या उलन व्यापारी असोसिशन शिष्टमंडळाने भेट घेतली. उबदार कपडे विक्री व्यवसाय सदर ठिकाणी केला जाऊ देऊ नये अशा प्रकारचा आयकर विभाग कार्यालयाकडून मनपा प्रशासनाला सतत केला जाणारा पत्रव्यवहार व त्यातून व्यवसाय करताना होणारा त्रास याबाबत शिष्टमंडळाने आपले गाऱ्हाणे मांडले. यावर आमदार अमित देशमुख यांनी संबंधितांना याबाबत सूचना केल्या जातील असे सांगितले. यावेळी उलन व्यापारी असोसएशनचे शफी आमिनसाब बागवान, शेख अमिम, दस्तगीर सय्यद, जवाहिर पठाण, कमाल पठाण, जाबेर पठाण, अजिजुल पठाण, ताहेर पठाण, देविदास यमगर, अजीज शेख, वाजीद शेख, मुकरम टाके, शाहाजान सय्यद, सलमान सय्यद, परवेज मणियार, अतिकुल रहेमान, पठाण जफर उपस्थित होते.


Comments

Top