बांधकाम स्थळी भेट, वसतिगृह इमारत कामाविषयी केल्या अधिकाऱ्यांना सूचना
लातूर: अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी तत्कालीन काँग्रेस महाआघाडी सरकारने मंजूर केलेल्या लातूर शहरातील औसा रस्त्यावरील निवासी वसतीगृहाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या वसतीगृहात शंभर मुलीसाठी निवास व भोजन व्यवस्था शासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. या वसतीगृह इमारतीस माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी भेट देऊन अधिकाऱ्यासह कामाची पाहणी केली व या पाहणी वेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लातूर सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता जी. एस. मिटकरी, उपअभियंता एस. डी. सावळकर, कार्यकारी अभियंता बी. एम. थोरात यांना वसतिगृह इमारत बांधकाम, तसेच या वसतीगृहात येणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील मुलींना देण्यात येणारी निवास व भोजन सुविधा, इमारत परिसर सुरक्षा सुविधा बाबत माहिती घेतली व आवश्यक सूचना केल्या. यावेळी मोईज शेख, इम्रान सय्यद, दगडूसाहेब पडीले यांच्यासह अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments