HOME   लातूर न्यूज

रेणापूर भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे

रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण, मांजरा पट्ट्याला भगदाड?


रेणापूर भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे

लातूर: रेणापूर तालुक्यामधील भारतीय जनता पक्षातील महिला आघाडीचे संघटन मजबूत करण्यासाठी गावा-गावातील महिलांना भाजपा तालुका उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष, प्रसिध्दी प्रमुख आणि सदस्य पदी सहभागी करुन घेण्यात आले आहे. या महिला पदाधिकाऱ्यांना लातूर ग्रामीण भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते लातूर येथे नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
रेणापूर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी लखमापूर येथील सविता खाडप, कुंभारी येथील अनुसया फड, घनसरगाव येथील विमल कापसे, तळणी येथील कांचन मामडगे, कुंभारवाडी येथील अंबुबाई पुंडकरे, रेणापूर येथील जमुनाबाई राठोड, सेलू येथील लक्ष्मीबाई बोळंगे, व्हटी सायगाव येथील माधुरी कराड यांची नियुक्ती करण्यात आली असून सरचिटणीसपदी घनसरगाव येथील चंद्रकला इंगोले, गव्हाण येथील संध्या पवार, कारेपूर येथील बायणाबाई साळवे, कोष्टगाव येथील चंचला घुले, रेणापूर येथील सुरेखा चव्हाण, चिटणीसपदी वाला येथील मालणबाई भंडारे, कामखेडा येथील आशा पवार, मुसळेवाडी येथील सुरेखा जाधव, कुंभारवाडी येथील पार्वती दाडगे, गोविंद नगर येथील वंदणा चव्हाण, मंगल लोमटे, अनुसया उपाटे, पानगाव येथील विठाबाई वैष्णव, खरोळा येथील प्रणीता फुलारी, खलंग्री येथील सरस्वती नागरगोजे, गरसुळी येथील सुजाता चव्हाण, रेणापूर येथील सोजरबाई आवळे, कोषाध्यक्षपदी पानगाव येथील शोभा कुरे, प्रसिध्दी प्रमुख म्हणून रेणापूर येथील माया घोडके, घनसरगाव येथील रत्माला कापसे, रेणापूर येथील आरती राठोड, बिटरगाव येथील रेश्मा जगताप, रामवाडी येथील रुपाली येलगटे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदस्यपदी रेणापूर तालुक्यातील गंगुबाई पुंडकरे, संगिता दास, राजश्री करमुडे, भामाबाई करमुडे, राबियाबी शेख, सिताबाई सिरसाट यांच्यासह गावा-गावातील महिलांची निवड करुन त्यांना भाजपात सहभागी करुन घेण्यात आले आहे. या नवनिर्वाचीत महिला पदाधिकाऱ्यांना भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मांजरा पट्ट्याला भगदाड?
लातूर ग्रामीण मतदार संघात आमदार नसतानाही दमदार कामगिरी करीत असलेले भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूर तालुक्यातील मौजे बोडका येथील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. बोडका येथील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रेवश केल्याने मांजरा पट्टयात काँग्रेसला भगदाड पडले आहे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


Comments

Top