लातूर: येथील बार्शी रोड परिसरात दयानंद कॉलेज पासून एक नंबर चौकापर्यंत ३०० पेक्षा अधिक कडुलिंबाच्या मोठ्या वृक्षांची वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या प्रतिष्ठीत नागरिक, नगरसेवक, डॉक्टरांचा ग्रुप, सेवानिवृत्त कर्मचारी, सरकारी कर्मचारी आदींसह अनेकांनी वैयक्तिक झाड स्वरूपात योगदान देऊन पुढाकार घेतला आहे. लातूर वृक्षच्या सदस्यांनी हा 'स्वच्छ परिसर, हरित परिसर व सुरक्षित परिसर' ऑक्सिजनयुक्त व्हावा यासाठी जूनपासून वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहिम हाती घेतली आहे. परंतु, या वृक्षाचे जनावरे व मनुष्यापासून संरक्षण करण्याची गरज लक्षात घेऊन संपुर्ण वृक्ष ट्री गार्डने संरक्षित करण्याची आवश्यकता होती.
दुभाजका मध्ये काही अडचण नाही
या मोहीमेत अनेकांनी वृक्ष देऊन प्रारंभ केला. आजपर्यंत १५० पेक्षा जास्त कडुलिंबाच्या ०५ फुटांपेक्षा उंच वृक्षांची लागवड झाली आहे. अजून वृक्षांची गरज आहे. ज्यांना ईच्छा आहे त्यांनी सकाळी ०६ ते ८.३० या वेळेत येऊन श्रमदान करावे व वृक्ष देऊन सहकार्य करावे असे आवाहन लातूर वृक्षचे समन्वयक सुपर्ण जगताप यांनी केले आहे. प्रत्येक व्यक्तींनी जन्मदिनी, लग्नाच्या वाढदिवशी, आई-वडील, मुले-मुलींच्या नावे वृक्ष लागवड करून चळवळीत सहभागी होऊन वृक्षसंवर्धन करावे. झाडांमध्ये आपल्या भावना गुंतल्यास निश्चितच मानवाचे वृक्षप्रेम वाढीस लागून वृक्षसंवर्धन होईल. या मोहिमेत शहरातील विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी, डॉक्टर, शासकीय कर्मचारी आदी योगदान देतच आहेत. तसेच शहरातील प्रतिष्ठीत नागरिकही सहभागी होत आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. या सहभागामुळे माझे झाड, माझा परिसर, माझे लातूर ही भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. आज स्वतःहून सहभागी झालेले शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य गव्हाणे सर, उद्योजक उमाकांत पेन्सलवार, नगरसेवक रघुनाथ मदने, अयुब मणियार, उमाकांत शेळके, डॉ बालाजी सांळुके, शिरीष कुलकर्णी, माजी निवृत्त अधिकारी कुंचमवार, रविकांत मुंढे, बालाजी, यश अॅकाडमीचे पल्लवी कुलकर्णी, यश कुलकर्णी, मेडाचे तीन जिल्ह्याचे प्रमुख देविदास कुलकर्णी यांनीही श्रमदान केले. यावेळी डॉ पवन लढ्ढा, नगरसेवक इम्रान सय्यद, डॉ बी. आर. पाटील, नगरसेवक विजयकुमार साबदे, अॅड वैशाली लोंढे, डॉ कडतने, प्रा संध्या वाडीकर, सातपुते सर, डॉ. बालाजी सोळुंके, डॉ. अमोल घोरपडे, कोशोर पवार, धनंजय शेळके उपस्थित होते.
Comments