लातूर: अमृतची कामे निविदेप्रमाणे पूर्ण झाली आहेत. ही कामे जलद गतीने केली आहेत. जागेच्या अडचणी, परवानग्या न मिळणे आणि मनपामुळे कामाला उशीर लागला. काही कामे निविदे व्यतिरिक्त करावी लागली. अडचणींचे निराकरण मनपाने न केल्यामुळे कामास वेळ लागला. कामाचे अंतिम बील द्यावे, जीएसटी फरकाची रक्कम द्यावी, अन्यायकारक पद्धतीने लावलेली दंडाची रक्कम परत द्यावी अशी मागणी अमृतच्या गुत्तेदाराने केली आहे. नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांना तसे पत्र गुत्तेदाराने पाठवले आहे. त्याला शासनानेही उत्तम प्रतिसाद दिला आहे. योजनेत समाविष्ट सहा उपांगांची कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत, सात उपांगातील कामे ९९ टक्के पूर्ण झाली आहेत. एक टक्का काम मनपाने माहिती न दिल्याने राहिले आहे. गुत्तेदाराला प्रलंबित देयके तात्काळ ३१ ऑगस्ट पर्यंत द्यावीत. तसेच उर्वरीत कामेही ३१ पूर्वीच करुन घ्यावीत असे फर्मान नगरविकास खात्याच्या सह सचिवांनी काढले आहे!
Comments