HOME   लातूर न्यूज

शॉर्ट सर्किटमुळे चार दुकानांना आग, मोठे नुकसान

माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी


शॉर्ट सर्किटमुळे चार दुकानांना आग, मोठे नुकसान

लातूर: शहरातील लातूर-बाभळगाव रोडवरील दगडोजीराव देशमुख चौकातील ०४ दुकानांना ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ०३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून लाखोचे नुकसान झाले. मंगळवार ०३ सप्टेंबर रोजी आखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी शॉर्ट सर्किटमुळे जळालेल्या चारही दुकानाची घटनास्थळी जावून पाहणी केली. अर्शदभाई देशमुख यांच्या प्रिन्स आटो ग्लास व सुलतान टायर्स, टायर गोडावून अशा एकूण चारही दुकानांतील अंदाजे २० लाख रुपयांच्या साहित्याचे आगीत नुकसान झाले. याबबत तहसीलदार व महावितरण अधिकाऱ्यांना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सूचना दिल्या. या सूचनेनंतर लगेचच महावितरण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी रफिक देशमुख, आर्शद आबेद खान देशमुख यांच्यासह परिसरातील दुकानदार, नागरिक उपस्थित होते.


Comments

Top