HOME   लातूर न्यूज

आ. अमित देशमुख कॉंग्रेसमध्येच!

नव्या होर्डींगमुळे ‘काळजी’ करणार्‍यांचा जीव भांड्यात...


आ. अमित देशमुख कॉंग्रेसमध्येच!

लातूर: आ. अमित देशमुख यांचं काय? असा प्रश्न अलिकडे लातुरात मोठ्या चवीने, उत्सुकतेने, काळजीने आणि बर्‍याच जणांनी गमतीनेही चघळला. कारणही तसेच होते. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधून होणारी गळती आणि भाजपात होणारी आश्चर्यजनक भरती सगळ्यांच्याच डोळ्यात आली होती. आ. अमित देशमुखही असंच करतील अशी चर्चा का आणि कुणाला पेरावी वाटली ते कळालं नाही. मुख्यमंत्री लातूर दौर्‍यावर आले होते. ते निलंग्याला जाताना बाभळगावला गढीवर जातील असं अनेक ‘गडी’ छातीठोकपणे सांगत होते. सोशल मिडियात याच विषयावर जोरदार खलबते सुरु होती. मेसेजेसचा मारा सुरु होता. झाले भलतेच. नंतर आ. देशमुखांचं हेलीकॉप्टर मातोश्रीवर घिरट्या घालतंय अशी चर्चा कानावर आली. आमच्याकडे शक्य नाही, तुम्हाला मंत्रीपद देणे शक्य नाही. तुम्ही उद्धवजींना भेटा. मी त्यांच्याशी बोलतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं बोललं गेलं. आज ही चर्चाही थांबली आहे. कारण आ. अमित देशमुख यांची शहरभर झळकणारी होर्डींग्ज! ‘लातुरच्या विकासासाठी पुन्हा एकत्र येऊयात, त्य़ाचा श्रीगणेशा बाप्पाच्या उत्सवाने करुयात’ असे आवाहन या होर्डीम्गवर छापण्यात आले आहे. एका बाजुला लोकनेते विलासराव देशमुख यांचे छायाचित्र आहे आणि खालच्या बाजुला कॉंग्रेसचे चिन्ह आहे. त्यातच अलिकडे झालेल्या बूथ प्रमुखांची बैठकही बरंच काही सांगून गेली. आता या सगळ्या चर्चा थांबल्या आहेत! सोशल मिडियाचे प्लॅटफॉर्म नव्या गाडीची प्रतिक्षा करीत आहेत.


Comments

Top