लातूर: काँग्रेस-राष्ट्रवादीने आजपर्यंत गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना वेठीस धरून आपली खुर्ची शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांना लुटले अशा अनेक पुढाऱ्यावर गुन्हे दाखल झाले असून कोर्टाने जामीनही नाकारला आहे. जैसी करणी वैसी भरणी या प्रमाणे केलेल्या पापाची इथेच आणि लगेच परतफेड होतच असते असे प्रतिपादन भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात सुरु केलेल्या जनसंवाद दौऱ्यात ठिकठिकाणी आयोजित ग्रामस्थाच्या बैठकीत बोलताना केले. या जनसंवाद दौऱ्यात शनिवारी रेणापूर तालुक्यातील आरजखेडा, सिंधगाव, पोहेगाव, ईटी, शेरा, खरोळा, कुंभारवाडी, सय्यदपुर, तळणी, मोहगाव या गावांचा दौरा करून मुलभूत सुविधा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रस्ता, नाली, सांस्कृतीक सभागृह, स्मशानभूमी शेडसह विविध विकास कामांचे भूमीपुजन केले. या जनसंवाद दौऱ्याला प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात रमेशआप्पा कराड यांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. रमेशआप्पा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. भाजपा कार्यकर्त्या बरोबरच ग्रामस्थात मोठा उत्साह दिसून येत होता. या दौऱ्यात भाजपाचे अनिल भिसे, दशरथ सरवदे श्रीकृष्ण जाधव, साहेबराव मुळे, अनंत चव्हाण, रमेश सोनवणे गंगासिंह कदम, सुधाकर गवळी, विजय चव्हाण, श्रीकृष्ण पवार, महेश कणसे, अनिल येलगटे, रमाकांत फुलारी, वसंत करमुडे, शिला आचार्य, वंदना गायकवाड, मंजुषा ढेपे, अनुसया फड, अप्सरा पठाण, शास्त्री चव्हाण, विठ्ठल कसपटे, अजित पाटील कृष्णा मोटेगावकर, संतोष चव्हाण, गोपाळ पवार, जलील शेख, श्रीमंत नागरगोजे, सतिष बिराजदार, चंद्रसेन रेड्डी, प्रशांत शिंदे, रवींद्र पाटील, सुरेश बुड्ढे, पांडुरंग शिंदे, राज जाधव, नानासाहेब कसपटे, सदाशिव राठोड यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना रमेशअप्पा कराड यांनी ठिकठिकाणी झालेल्या बैठकीत जनतेशी थेट संवाद साधून अडी-अडचणी समजून घेतल्या. काँग्रेस शासनाचा कार्यकाळ आणि सत्तांतरानंतर भाजपा शासनाचा कार्यकाळ कसा वाटतो याबाबत जनतेच्या मनातील भावना जाणून घेतल्या. घरकुल, रेशनचा माल, गॅस, लाईट मीटर, निराधाराच्या पगारी, अनुदान कर्जमाफी, वैयक्तिक शौचालय यासह अनेक प्रश्न विचारुन उपस्थितांना बोलते केले. तेंव्हा ज्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळाला, शासनाचे निर्णय याबाबत अनेकांनी केंद्र आणि राज्यतील भाजपा सरकार विषयी समाधान व्यक्त केले.
Comments