लातूर: लातुरच्या वीरशैव युवा सेवाभावी संस्था व लिंगायत समाजाच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शाम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यात लिंगायत समाजातील बहुतांश पोटजातीही सहभागी होणार आहेत. या मेळाव्यास येणार्या सर्वांसाठी भोजन आणि निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भालचंद्र येडवे, केदारअप्पा रासुरे, विजयकुमार चितकोटे, वीरभद्रअप्पा वाले, रामलिंग ठेसे, सतीश खेकडे, भिमाशंकर अंकलकोटे, शिवकांत स्वामी यांनी ही माहिती दिली. संस्थेला मिळणार्या निधीतून सर्वांसाठी रुग्णवाहिका सेवाही सुरु करण्यात येणार आहे.
या मेळाव्याला उदघाटक म्हणून आ. अमित देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, नागनाथ निडवदे, श्रीशैल्य उटगे उपस्थित राहणार आहेत. आजवर ३६० वधू-वरांनी नोंदणी केली आहे. विधवा, विधूर, घटस्फोटीतांचीही नोंदणी केली जात आहे.
Comments