लातूर: केंद्र व राज्य शासनाच्या महिला, कामगार, जेष्ठ नागरीक, शेतकरी व सामान्य व्यक्तीसाठी असंख्य योजना आहेत. त्या योजना त्यांच्या दारा पर्यंत पोहचवून त्यांना आर्थिक सुबत्ता मिळवून देण्याचे कार्य प्रामाणिकपणे करू असे प्रतिपादन ग्रामीण भागातील बारा नंब्र पाटी, हरंगुळ खु, नांदगाव, आर्वी येथील ग्रामस्थाच्या बैठकीत अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी निळकंठराव पवार, रणजीतसिंह पाटील कव्हेकर, हरंगुळचे सरपंच नरेंद्र बनसोडे, संपत शिंदे, गोविंद मुंडे, गोपाळ कसपटे, लक्ष्मण मोरे, आंगद कुरे, अरूण चव्हाण, अशोक तिगीले, दयाराम सुडे, सचिन राऊतराव आदी उपस्थित होते.
प्रभागाप्रमाणे शहराला मॉडेल सिटी बनवू
प्रभाग १८ च्या जनता जनार्धनाने आम्हाला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी गेल्या अडीच वर्षा पासूनन दिली. तो प्रभाग लातूर व महाराष्ट्रात विविध नाविन्यपूर्ण योजनेमुळे मॉडेल बनला आहे. ग्रामीण भागात फिरत असताणा अनेक गावामध्ये विविध प्रश्न भीषण बनले आहेत. तो सोडवण्याचा प्रयत्न झालेला दिसत नाही. आम्ही सर्वांना सन्मान व सहकार्य देऊन प्रभाग १८ प्रमाणे शहराला मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करू असा विश्वास अजितसिंह पाटील यांनी यावेळी दिला. या ग्राम बैठकीत गावा-गावातील जनता, तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Comments