लातूर: लातूर शहरातील यलम समाज बांधवांची नुकतीच माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी बैठक घेतली. समाजातील सर्व समाज बांधवांशी संवाद साधून सत्ताधाऱ्यांची चुकीची धोरणे आणि सद्यपरिस्थिती याची माहिती देणे, यलम समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार यासह विविध प्रश्नांवर यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख आणि यलम समाज बांधवा सोबत चर्चा करण्यात आली. अमित विलासराव देशमुख आणि यलम समाजातील समाज बांधव यांच्यात संवाद साधला जावा यासाठी यलम समाज बांधवांच्या वतीने मेळावा घेण्याबाबत वेळेची मागणी यलम समाज बांधवांकडून यावेळी करण्यात आली. या बैठकीस ओमप्रकाश पडीले, डॉ. डी.एन.चींते, सुदाम रुकमे, नामदेव इगे, ज्ञानोबा पिनाटे, सचिन बंडापल्ले, विष्णु खंदाडे, दगडूसाहेब पडीले, सुनील पडीले, महादेव जटाळ, चंद्रशेखर दंडीमे, रमेश थोरमोटे, दिनेश गोजमगुंडे, अभिजित इगे, सुहास मिरकले, महेश नयने, बालाजी वलाकटे, रामचंद्र सुडे, श्याम बरुरे, सतीश कुटवाडे, सूर्यकांत सुडे, विजयकुमार साबदे, विठ्ठल मलवाडे, सुधाकर सुरकुटे यांच्यासह येलम समाज बांधव उपस्थित होते.
Comments