लातूर: कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना लातुरकरांनी अधिकाधिक मदत केली. सांगलीकरांना तर भरभरुन दिले. लातुरहून पुण्यातल्या पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागात स्थायिक झालेल्या लातुरकरांनी लातूर जिल्हा मित्र मंडळ पिंपरी चिंचवड स्थापन केले आहे. या मंडळाने मागच्या दुष्काळात लातुरकरांना पाण्याच्या टाक्या दिल्या होत्या. आता लातूर जिल्हा स्नेह मेळाव्याचे आयोजन करुन ५१ हजार रुपयांचा निधी पूरग्रस्तांसाठी दिला. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्याकडे तो सुपूर्त केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भास्कर जगताप, कार्याध्यक्ष शिवाजी बिरादार, सचिव भागवत गंगापुरे, सदस्य वामनराव दळवी, राजेश्वर सपाटे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
(भास्कर जगताप ९९६००२८११५)
Comments