आजलातूर: भाजी घेताना काटा तपासतो, वस्तू घेताना एमआरपी पाहतो, औषधं घेताना एक्स्पायरी पाहतो, कपडे घेताना दहादा विचार करतो अन लाईट बील आल्यावर? घाईनं भरुन टाकतो. ज्या मीटरमुळं बील तयार होतं ते कधी तपासलंय? महवितरणनं ईटर बदलल्यावर त्याचा मेक पाहिलाय? मीटर चाचणीचा अहवाल कधी मागितलाय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशीच आहेत. अलिकडे मीटर बदलली गेली ती तुम्हाला सांगून बदललीत? म्हणे ही मीटर्स अद्ययावत आहेत, अचूक आहेत. मग आधीची मीटर्स चुकीची होती? मग चुकीची मीटर् ग्राहकांच्या माथी मारलीच की नाही? थोडक्यात वीज कंपनीच आपण चूक केल्याचं सांगते मग या चुकीची शिक्षा कुणाला द्यायची? वीज महत्वाचा घटक आहे, ग्राहक वागवाल तसे वागतो म्हणजे नागरिक शेवटी आंधळाच, हो की नाही?
एक युनिट ईज जळण्यासाठी कोणतं उपकरण किती वेळ चालवावं लागतं हे माहित आहे? मीटर ग्राहकासमोर तपासले आहे का? त्याचा अहवाल कधी ग्राहकाला दिला आहे का? बाकीच्या राज्यांचं माहित नाही पण महाराष्ट्रात ही लूट बिनधास्तपणे चालू आहे त्याचा जाब कधी विचारणार?
प्राप्त माहितीनुसार वीज कंपनी मागचे नुकसान भरुन काढण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी महावितरण वाढीव बिले देत आहे ही माहिती महावितरणच्याच एका ‘चांगल्या’ अभियंत्याने दिली!
- दिनेश गिल्डा
(माझा सवाल: यापुढे दर रविवारी. तुमच्या प्रतिक्रिया, तुम्हाला पडलेले प्रश्न जरुर पाठवा. इमेल aajlatur@gmail.com)
Comments