HOME   लातूर न्यूज

मुख्यमंत्री कोण होणार? फडणवीस-ठाकरेंनी सांगू नये

अमित देशमुख यांचा इशारा, ठिकठिकाणी संवाद बैठका, ग्रामस्थांशी संपर्क


मुख्यमंत्री कोण होणार? फडणवीस-ठाकरेंनी सांगू नये

लातूर: महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा हे देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरे यांनी ठरवू नये तर जनता ठरवेल असा सल्ला आमदार अमित देशमुख यांनी विद्यमान सत्तधार्‍यांना दिला, ते हरंगूळ (खु) येथे जनसंपर्क अभियाना अंतर्गत संवाद बैठकीत बोलत होते. आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क अभियाना अंतर्गत लातूर शहर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर मतदारसंघातील हरंगूळ (खु) या गावास भेट दिली व ग्रामस्थाशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, आज राज्याची व देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. शेतमालाला योग्य भाव नाही, सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रमाण कमी होण्या ऐवजी उलट वाढत आहे, गेल्या पाच वर्षात शेतकरी आत्महत्या दुपटीने वाढल्या आहेत, उद्योग धंदे बंद पडत आहेत. मात्र असे असताना विद्यमान युतीचे सरकार यावर गंभीर नाही. सरकारची राबविण्यात येत असलेली चुकीची धोरणे, शेतीमाल बाजारपेठ या साठी विद्यमान सरकार कडून राबविले जाणारे जाचक कायदे यास कारणीभूत आहेत. लोकप्रतिनिधी म्हटल्यास त्यांने प्रामाणिकपणे, जनतेचे प्रश्न सोडविणे, लोककल्याणकारी योजना राबविणे अत्यंत महत्वाचे आहे असे म्हणत या निवडणुकीत सत्तापरिवर्तन निर्धार मतदारांनी केला आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा हे देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरे यांनी ठरवू नये तर विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदार राजा राज्याची जनता ठरवेल असा सल्ला आमदार अमित देशमुख यांनी विद्यमान सत्तधाऱ्यांना दिला.
यावेळी ॲड. विक्रम हिप्परकर, सोनाली थोरमोटे, जितेंद्र स्वामी, दादाराव पवार, दिगंबर पवार, दगडू साहेब पडिले, विजयकुमार साबदे, रामभाऊ झूंजे पाटील, नीलकंठ गावकरे, सोमनाथ पाटील, सुनील राठोड, शांतविर पाटील, मनोहर झूंजे पाटील, धोंडीराम पवार, भारत पाटील, शिवाजी झुंजे, आनंद भुजबळ, प्रवीण झूंजे, जयराम जाधव, रमेश पाटील, संतराम होळकर यांच्यासह हरंगुळ (खु) येथील ग्रामस्थ, युवक, महिला भगिनी उपस्थित होत्या.


Comments

Top