HOME   लातूर न्यूज

मंत्री, मुख्यमंत्री पदासाठी महायुती भांडणात दंग

सामान्यांच्या हितासाठी आघाडीच उत्तम पर्याय- धीरज देशमुख


मंत्री, मुख्यमंत्री पदासाठी महायुती भांडणात दंग

लातूर: भाजप युती आपली सत्ता टिकविण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण येथील सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी, बंद पडलेले उद्योग धंद्यांकडे कोणाचे लक्ष नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्री इकडे येऊन जनहिताची कामे करण्याऐवजी पक्षाची कामे करतात. मंत्री, मुख्यमंत्री पदासाठी भाजप युती सध्या भांडण करीत आहे. त्यामुळे आत्महत्या, बेरोजगारी, स्थानिक लघुउद्योगधंदे यावर ठोस निर्णय घेण्यासाठी आपल्या हक्काच्या काँग्रेस महाआघाडी सरकारला मताधिक्य देऊन विजयी करावे, असे आवाहन लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांनी केले.
देशमुख यांच्या प्रचारार्थ औसा तालुक्यातील सिंदाळा, सिंदाळावाडी, येल्लोरीवाडी, वरवडा, वडजी, बर्हाणपूर-हळदुर्ग, वानवडा, कोरंगळा, समदर्गा, उटी बु., लखनगाव, सत्तधरवाडी येथे प्रचार सभा व ग्रामस्थांशी संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशमुख यांनी विविध ठिकाणच्या ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी श्रीशैल्य उटगे, धनंजय देशमुख, नारायणराव लोखंडे, गणपतराव बाजुळगे, शाम भोसले, सचिन दाताळ, उदयसिंह देशमुख, नरेंद्र भादेकर, सदाशिव कदम, शिवप्रसाद शिंदे, दत्तोपंत सूर्यवंशी, चाँदपाशा अन्सारी, प्रदीप राठोड, हरिश्चंद्र यादव आदीसह रामदास सोमवंशी, शांतेश्वर मिरकुले, बालाजी सुर्यवंशी, शिवशंकर काळे, अभिमन्यु सुर्यवंशी, सचीन मिरकले, शहाजी पाटील, दशरथ सर्जे, मारुती चिंचोलकर, विजयकुमार सर्जे, अमोल सर्जे, रमाकांत चिंचोलकर, रामेश्वर गवळी, अशोक करंडे, अर्जुन मुरूमकर, मोहन यादव, गुणवंत कुरडे, भरत पाटील, अकबर दरवेशी, हणमंत गवळी, दगडू मुळे, गोविंद कोळी, बाशुमियाँ शेख, बाबू ठेसे, इस्माईल दरवेशी आदींसह ठिकठिकाणचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
भूमिपुत्रांसाठी स्थानिक उद्योग उभारणी
औशाचा मारुती महाराज पावल्यापासून काँग्रेसला चांगले दिवस आले आहेत. तेव्हा औशाचा मारुती महाराज हाताच्या पंजालाच पावणार असल्याचे सांगून धीरज देशमुख म्हणाले, औशाच्या भुमिपुत्रांचे सत्तेसाठी भांडण सुरु आहे. पण येथील स्थानिक प्रश्न सोडविण्याकडे त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे भूमिपुत्रांनो आपला विकास आपणच केला पाहिजे. काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यास राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या भागाला पोषक उद्योग उभारून रोजगार उपलब्ध करण्यात येईल.


Comments

Top