लातूर: विधानसभा निवडणूक २०१९ करिता काँग्रेस महाआघाडीकडून मतदारांना मतदान पोलचीट वितरण कार्यक्रमाची सुरुवात लातूर शहर विधानसभा मतदार संघातील सर्व प्रभाग व बूथमध्ये एकाच वेळी करण्यात आले आहे. या अंतर्गत लातूर शहर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी स्वत:च्या बुथमध्ये बाभळगाव मतदारांची भेट घेऊन पोलचीट वितरण केले. लातूर शहर विधानसभा मतदार संघातील सर्व बूथ व प्रभागात बूथ प्रमुख, प्रभाग समन्वयक, झोन प्रमुख, राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्त्यांनी लातूर शहर विधानसभा मतदार संघातील जवळपास ३३५ बूथ मधील मतदारांना विधानसभा निवडणूक मतदार पोलचिटचे वितरण केले. बाभळगाव येथील बूथ क्रमांक ३१० मधील जवळपास १५० कुटुंबांतील मतदारांना लातूर शहर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अमित देशमुख यांनी स्वतः मतदान पोलचीटचे वितरण केले. आमदार अमित देशमुख यांनी मतदारांना पोलचीट वितरण केल्यानंतर बाभळगाव निवासस्थानी मतदान केंद्रांचे बूथ प्रमुख, पेज प्रमुख यांची बैठक घेतली.
यावेळी गोविंद देशमुख, शिवाजी जाधव, संतोष देशमुख, व्यंकट महाराज थडकर, अय्युब शेख, संतोष चौधरी, गोपाळ तापडे, महादेव तोडकर, सुनील देशमुख, स्वप्नील देशमुख, इर्शाद सय्यद, विनायक सौदागर, अविनाश बट्टेवार, विष्णु चव्हाण, रशीद शेख, कैलास देशमुख, चंद्रकांत तोडकर, अशोक थडकर, विनोद थडकर, शिवलिंग थडकर, भिमराव शिंदे, नीलकंठ सोनटक्के यांच्यासह बूथ प्रमुख, पेज प्रमुख, कार्यकर्ते, बाभळगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments