लातूर: लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार अमित देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क अभियानांतर्गत लातूर शहरातील प्रभाग एक व आठमधून पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांना त्यांना निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. शहरातील हत्ते चौक येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेऊन देशमुख यांनी आरती केली व आशीर्वाद घेत पदयात्रेला सुरुवात केली. हत्तेनगर चौक, रत्नापूर चौक, सिद्धेश्वर चौक, काळे गल्ली, सूळ गल्ली, बसवेश्वर कॉलेज आझाद चौक चौकमार्गे पदयात्रा केली. त्यांनी परिसरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांनी प्रभागातील समस्याही जाणून घेतल्या. काँग्रेस महाआघाडीचा जाहीरनामा नागरिकांच्या हातामध्ये देत महाआघाडीला विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. भावी मुख्यमंत्री अमित देशमुख, एकच भैय्या अमित भैय्या आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी मोईज शेख,अशोक गोविंदपूरकर, समद पटेल, प्रशांत पाटील, विक्रांत गोजमगुंडे, दगडूअप्पा मिटकरी, गोरोबा लोखंडे, व्यंकटेश पुरी, चांदपाशा इनामदार, इम्रान सय्यद, राम गोरड, सिकंदर पटेल, देविदास बोरुळे पाटील, किशोर राजुरे, रणधीर सूर्यवंशी, राजेंद्र राजुरे यांच्यासह प्रभाग ०१ व ०८ मधील काँग्रेस महाआघाडीचे विविध पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments