औसा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे अभिमन्यू पवार या नेतृत्वाला महिलांनी साथ द्यावी असे आवाहन महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले. महिला बचत गटाच्या माध्यमातून याठिकाणी खूप मोठी चळवळ उभी राहणार असून महिलांच्या हाताला काम मिळणार आहे. यामुळे सन्मानाची वागणूक मिळणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी भाजप सरकारने चांगले कार्य केले असून या कामाला अभिमन्यू पवार यांच्या रुपाने गती मिळणार आहे असे चित्रा वाघ यांनी सांगितले. मतदारसंघातील किल्लारी साखर कारखाना सुरू करुन या भागातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर दुग्धव्यवसायाची जोड देवून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आपण येणाऱ्या काळात काम करणार आहोत. तसेच कासारशिरसीला चांगल्या बाजारपेठेचे स्वरूप येण्यासाठी याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करणार असल्याचे अभिवचन महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांनी दिले. यावेळी शिवसेना महिला संघटक शोभा बेंजरगे, उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, माथाडी कामगार सेनेचे शिवाजी माने, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख पप्पुभाई कुलकर्णी, शिवसेना तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, दिलीप ढोबळे, विलास लोभे, उस्तुरीच्या सरपंच सावित्री ईरले, उपसरपंच मल्लिकार्जुन दानाई, श्रीकांत दानाई, दत्ताञय गुंजोटे, नितीन पाटील, जिलानी बागवान, करबस पाटील, ओम बिराजदार, संजय मुळे, भालचंद्र पाटील, विलास बालकुंदे उपस्थित होते.
Comments