लातूर: या तीन चार दिवसात परतीच्या पावसाने केलेल्या मेहेरबानीने लातुरकरांना काहीसा दिलासा दिला आहे. मांजरा धरणात सात दश लक्ष घनमीटर पाण्याची वाढ झाली आहे. अजूनही पाण्याची आवक सुरुच आहे. यासोबतच वांगदरी, कारसा पोहरेगाव आणि वांजरखेड्याची बॅरेजेस भरली आहेत. नागझरी बॅरेजच्या पाण्यातही वाढ होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने दिलासा दिला आहे. भविष्यात लातुरला पाण्याची टंचाई भासणारच आहे. त्यासाठी निम्न तेरणा प्रकल्पातून पाणी आणण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे पण त्यावर अजून काम बाकी आहे. धरण आणि बॅरेजेसमध्ये आलेले पाणी फक्त पिण्यासाठी वापरले जावे यासाठी ऊसासाठी या पाण्याचा वापर होऊ नये याकडे लक्ष द्यावे लागेल.
Comments