HOME   लातूर न्यूज

नगरसेविकेने दिले स्वच्छता कर्मचार्‍यांना कपडे

वर्षा कुलकर्णी यांचा दिवाळीच्या निमित्ताने उतराई होणाचा अनोखा प्रयत्न


नगरसेविकेने दिले स्वच्छता कर्मचार्‍यांना कपडे

लातूर: लातूर शहर मनपाच्या प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका वर्षा शिरीष कुलकर्णी यांच्या तर्फे मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळीचे औचित्य साधून साडी-चोळी, पँट-शर्ट असा भरपेहराव भेट देण्यात आला. यावेळी नगरसेविका वर्षा कुलकर्णी, भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, मनपाचे झोनल अधिकारी संजय कुलकर्णी, मातोश्री श्रीमती नलिनी कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळी भेटीचे वाटप करण्यात आले. दिवाळीचा सण सर्वांना आनंदाने साजरा करता यावा, या उद्देशाने आपण दरवर्षी अशा प्रकारची भेट देऊन कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतो, असे नगरसेविका कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. स्वच्छता कर्मचारी शहर परिसराची सफाई अत्यंत निष्ठेने व चांगल्या प्रकारे करतात, म्हणूनच शहरवासीय अशा प्रकारचे सण - उत्सव आनंदाने साजरे करू शकतात. या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Comments

Top