लातूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्म समभावाचा स्विकार केला. तोच समतेचा धर्मनिरपेक्ष विचार काँग्रेसने स्वीकारला आहे. मी स्वतः भाग्यवान आहे की, मी ज्या लातूर ग्रामीण मतदार संघाचे नेतृत्व करत आहे. त्या पानगावमध्ये डॉ. आंबेडकरांचे चैत्य स्मारक आहे. दुसरे म्हणजे रामेगावमध्ये हे महाविहार उभे राहत आहे. या महाविहाराचा विकास पानगावच्या धर्तीवर करू असे मत लातूर ग्रामीण आमदार धीरज देशमुख यांनी केले. ते लातूर तालुक्यातील रामेगाव येथे तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत बोलत होते. यावेळी खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार अभिमन्यू पवार राजा मणियार, आर. के. गायकवाड, एसपी गायकवाड, भिक्खू सदानंद महाथेरो, धम्मसेवक महाथेरो, डॉ. के. संघरक्षित महाथेरो, बोधीपाल महाथेरो, उप गुप्त महाथेरो व संयोजक पयानंद, धनंजय देशमुख, विजय देशमुख, गोविंद बोराडे, राजेसाहेब सवई, बबन ढगे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना ते असे म्हणाले की, आगामी काळात देश व जागतिक पातळीवरील बौध्द उपासक साधनेसाठी व दर्शनासाठी रामेगाव व पानगाव येथे येतील असा लौकीक आपण प्राप्त करण्यासाठी येईल असा विश्वास यावेळी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत आदमाने, मधुकर श्रृंगारे, ज्ञानेश्वर सुरवसे, दिनेश मस्के, संजय मस्के, प्रा. सावंत, प्रा. कटारे, उदय सोनवणे, यशपाल मस्के, सचीन मस्के, प्रकाश मस्के, सुदर्शन साबळे, सतेश मस्के यांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून नागरिक उपस्थित होते.
Comments