लातूर : येथील जेष्ठ अभियंता अतुल ठोंबरे यांची पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या स्थापत्य विभागाच्या अॅडव्हायझरी बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अभियंता धर्मवीर भारती, अभियंता अभिजीत देशपांडे, अभियंता मनिषा गिरी, आर्किटेक्ट प्रिती पटवारी यांची या अॅडव्हायझरी बोर्डाच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन हे सगळ्यात जुने व सर्वच पातळीवर महाराष्टातील अग्रगण्य तंत्रनिकेतन आहे. अशा प्रकारच्या महाराष्ट्रातील तंत्रनिकेतनचे शासनाच्या निर्देशानुसार नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडीटेशन NBA म्हणजेच राष्ट्रीय मंडळ मान्यता प्राप्त करणे आवश्यक आहे. तंत्रनिकेतनची गुणांत्मक दर्जा वाढ, विद्यार्थ्यांची तांत्रीक गुणात्मक वाढ, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकीय ज्ञानासोबत प्रात्यक्षिक, व्यावसायिक व व्यावहारीक ज्ञानात वाढ करण्यासाठी तसेच तंत्रनिकेतनला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मानांकन मिळवणे यासाठी NBA राष्टीय मंडळाची मान्याता घेणे आवश्यक आहे. यामध्ये तंत्रनिकेतनच्या प्रत्येक विभागासाठी अशासकीय अॅडव्हायझरी बोर्डाची स्थापना करणे बंधनकारक आहे. या बोर्डामध्ये त्या विभागातीस अनुभवी व यशस्वी उद्योजकांची अध्यक्ष व सदस्य म्हणून नेमणूक केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकी ज्ञानासोबत व्यावसायिक- व्यावहारिक ज्ञान मिळावे असा या अॅडव्हायझरी बोर्डाचा हेतू आहे. भारतात फक्त १५ टक्के संस्थानाच NBA नामांकन प्राप्त आहेत. यापुढे NBA मान्यता प्राप्त संस्था असेल तरच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व तसेच अशाच संस्थेला विकासासाठी शासन निधी मिळणार आहे. प्राचार्य डॉ. केएम बकवाड, उपप्राचार्य तथा सिव्हील हेड प्रा. कोंडावार, प्रा. बालाजी पोतदार, प्रा कुर्ले, प्रा. आवळे, प्रा. व्हीएम पाटील, प्रा. गिरगांवकर, प्रा. नंदू कुलकर्णी, प्रा. संतोष कुलकर्णी, प्रा. राठोड यांनी नियुक्त डिपार्टमेंट अॅडव्हायझरी बोर्ड अध्यक्ष व सदस्यंचे अभिनंदन केले आहे.
Comments