HOME   लातूर न्यूज

लातूर जिल्हा बॅंकेच्या बुधोडा शाखेचे उदघाटन

राजकीय व्यवस्थेतून सामाजिक परिवर्तन झाले पाहिजे- माजी मंत्री दिलीपराव देशमुख


लातूर जिल्हा बॅंकेच्या बुधोडा शाखेचे उदघाटन

औसा: देश आज एका वेगळ्या प्रसंगातून जात असून आर्थिक मंदीची झळ आता ग्रामीण भागातील बसायला सुरुवात झाली आहे. हा सर्व परिणाम एका रात्रीत कोणताही विचार न करता घेतलेला नोटबंदीच्या निर्णयाचा असून राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून आर्थिक चिंता दूर करायची असते. ती व्यवस्था सामाजिक परिवर्तनाच्या उपयोगी आणण्याची खरी गरज आहे असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
ते लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ११९ व्या औसा तालुक्यातील बुधोडा येथील शाखेचे उद्घाटनावेळी बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, औसा पंचायत समितीचे सभापती दत्तोपंत सूर्यवंशी, मांजरा साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, माजी चेअरमन एस आर देशमुख माजी चेअरमन यशवंतराव पाटील, संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, सौ शिवकन्या पिंपळे, संभाजीराव सूळ, प्रमोद जाधव सुधाकर रुकमे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोइज शेख, मारूती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, उपाध्यक्ष शाम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले, लातूर जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक चिंतेतून दूर झाला पाहिजे असे काम लातूर जिल्ह्यातील नेतृत्वाने जिल्हा बँकेच्या माध्यमातून करण्याचे काम केले आहे. मागील काही काळात साठ वर्षात तुम्ही काय केले असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत काही करायचे राहून गेले असेल म्हणूनच लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. काम करण्याऐवजी केवळ प्रश्‍न उपस्थित करून समाजाचे हीत साधता येत नाही असेही ते म्हणाले.
सातमजली बँक कल्पवृक्ष!
सात मजली बँक ही केवळ इमारत नसून ती लातूर जिल्ह्यासाठीचा कल्पवृक्ष आहे. ते शेतकऱ्यांचे मंदिर आहे. या समोरून जात असताना प्रत्येकाला त्याच्याविषयी आदरभाव वाटावा आणि त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे अशी इच्छा व्हावी अशाच पद्धतीचे पावित्र्य आजवर बँकेने जोपासलेले आहे आणि पुढेही अशाच प्रकारचे काम होणार आहे अशी भूमिका घेऊनच या ठिकाणी संचालक मंडळापासून कर्मचारी-अधिकारी सर्वजण काम करीत असतात आणि अशाच पद्धतीने पुढेही होणार आहे असल्याचे मत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.


Comments

Top