लातूर: शहरातील गरुड चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महिला तंत्रनिकेतन या प्रमुख रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी लातूरकरांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातही घडून आले होते. परंतु आता हा रस्ता नव्याने विकसित होणार असून याकरिता १२ कोटी ७७ लक्ष रुपयांचा निधी खर्च होणार आहे. जानेवारी २०२० अखेर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असून याकरिता १२ कोटी ७७ लक्ष इतका निधी खर्च होणार आहे. लातूर शहरचे आमदार तथा माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेवरून महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांच्या समवेत आढावा घेऊन पूर्ण झालेल्या निविदा प्रक्रियेतील तांत्रिक बाबींच्या पूर्तता करून प्रत्यक्ष कामास जानेवारी अखेरपर्यंत सुरुवात करण्याच्या सूचना करण्यात केल्या. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता गोगटे तसेच मनपाचे कार्यकारी अभियंता दिलीप चिद्रे उपस्थित होते. या मुख्य रस्त्याचे नूतनीकरण झाल्यास लातूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Comments