औसा: माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी औसा तालुक्यातील दौऱ्यात कवळी येथे शेतकरी संघटनेचे नेते तथा सरपंच राजेंद्र मोरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी मोरे कुटुंबियांच्या वतीने दिलीपराव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे, मांजरा कारखान्याचे व्हॉइस चेअरमन श्रीशैल्य उटगे, संचालक भगवानराव पाटील, पृथ्विराज सिरसाट, बालाप्रसाद बिदादा, उदय देशमुख, चांदपाशा इनामदार, राजेंद्र गीर महाराज यांचाही सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दिलीपराव देशमुख यांनी राजेंद्र मोरे यांनी सुरू केलेल्या चळवळीचे कौतुक केले. चळवळी जिवंत ठेवल्या पाहिजेत आणि त्यांना बळ दिले पाहिजे असे आवर्जून सांगितले. लातूर जिल्हा बॅंक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बॅंकेच्या वतीने एक लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास राजीव कसबे, प्रा गंगथडे, मनोज कावळे, भिसे सर आदी कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ आणि विविध गावातून जमलेले कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments