HOME   लातूर न्यूज

लातूर जिल्हा दर्पण पत्रकारिता पुरस्कार

पत्रकारांना प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन


लातूर जिल्हा दर्पण पत्रकारिता पुरस्कार

लातूर: लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने २०१९ चे दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्कृष्ट वार्ता, उत्कृष्ट शोधवार्ता, उत्कृष्ट दिवाळी अंक, उत्कृष्ट अग्रलेख आणि उत्कृष्ट छायाचित्र या पुरस्कारांचा यात सामावेश राहणार असून या पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी प्रवेशिका पाठवाव्यात असे अवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाने केले आहे. लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पणदिनानिमित्त दर्पण पुरस्कारांचे आयोजन केले जाते. यंदा या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. उत्कृष्ट शोधवार्ता विभाग, उत्कृष्ट वार्ता विभाग, उत्कृष्ट दिवाळी अंक, उत्कृष्ट उग्रलेख या चार विभागांतून प्रथम, द्वीतीय व तृतीय पुरस्कार देण्यात येणार असून, इलेक्ट्रॉनिक मेडीयाचा उत्कृष्ट वार्ता व उत्कृष्ट छायाचित्रासाठीही एक पुरस्कार देण्यात येणार आहे. उत्कृष्ट शोधवार्ता विभाग, उत्कृष्ट वार्ता तसेच छायाचित्र विभागासाठी प्रवेशिका पाठविताना वृत्तलेखनाच्या मूळ प्रतीसह सोबत तीन झेरॉक्स, संबंधित पत्रकाराचे पासपोर्ट छायाचित्र आणि संपादकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. दिवाळी अंकासाठी प्रवेशिका पाठवताना संपादकांनी स्वत:चे प्रमाणपत्र प्रवेशिकेसोबत जोडावे. तर इलेक्ट्रॉनिक मेडियाच्या उत्कृष्ट वार्ताकरिता सिडी द्यावी. या स्पर्धेत अधिकाधिक पत्रकारांनी सहभागी व्हावे व आपल्या प्रवेशिका पुरस्कार निवड समिती, द्वारा लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, मेनरोड लातूर, या पत्यावर ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, सचिव सचिन मिटकरी व पदाधिकार्‍यांनी केले आहे.


Comments

Top