लातूर: लातूर शहरातील गोरक्षणच्या मागे सापडलेला मृतदेह कुणाचा आहे, त्याचे काय झाले असावे असे अनेक अनुत्तरीत प्रश्न घेऊन लातूर पोलिस कामाला लागले. सप्टेंबर महिन्यातील हे प्रकरण खुनाचे आहे हे लक्षात आले. शिवाजीनगर पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी-कर्मचारी कामाला लागले आणि खुनाची उकल झाली. या प्रकरणात पोलिसांनी सात गुन्हेगारांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील यशस्वी कर्मचार्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सत्कार केला. प्रोत्साहन दिले.
मुरुडचे सुधीर महाजन उपचारासाठी लातुरात आले होते. आरोपींनी त्यांना बोलण्यात गुंतवून गोरक्षणच्या मागे आणले. त्यांचा खून केला. सोने, मोबाईल आणि रोख रक्कम पळवली. यात जावेद महेबुबसाब शेख, महमंद मुजाहीद ऊर्फ जावेद महमद जाफर खुरेशी, सचिन शिवाजी गायकवाड, संदीप शिवाजी गायकवाड, संदीप संजय समुद्रे, शुभम बाळु इंगळे, आकाश ऊर्फ भैया शिंदे यांना अटक करण्यात आली. या तपासात सचिन सांगळे उपविभागीय पोलीस अधिकारी, नानासाहेब लाकाळ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शिवाजीनगर, पोलीस उपनिरीक्षक जी बी कदम, पोलीस हवालदार जीडी शेख, पोलीस नाईक युवराज गिरी, अर्जुनसिंह हरीसिंह राजपुत, एमव्ही बोधले, राजेश कंचे, रियाज सौदागर यांनी प्रयत्न केला. त्यांचा पोलिस अधीक्षकांनी सत्कार केला. या कार्यक्रमावेळी अपर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, पोलीस उपअधीक्षक (गृह) बीएम हिरमुखे, तसेच जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.
Comments