HOME   लातूर न्यूज

महेबूब चाचांमुळे वाचले अडलेल्या गाय-वासराचे प्राण...

मनपाच्या पशुवैद्यकीय अधिकार्‍याचे नेमके काय काम ?


महेबूब चाचांमुळे वाचले अडलेल्या गाय-वासराचे प्राण...

लातूर: पक्षी मित्र महेबूब चाचा, पत्रकार बाळ होळीकर, डॉ. आर. एल. चव्हाण, परिचर व्ही. एफ. राठोड, सेवादाता अभय सोमवंशी व डॉ.अमोल शिंदे व परिसरातील महिला, बालकांमुळे हरिभाऊ नगरातील अडगळीच्या जागेत कोणाची तरी तडफडत पडून अडलेल्या गायीचे २० तासाच्या वेदनेनंतर प्रस्तूती आणि पुन्हा तिचे गर्भाशय बाहेर आल्यामुळे चार तासानंतर ते पूर्ववत बसविल्यामुळे गाय आणि वासराचे प्राण वाचले आहेत,गाय पालकांच्या बेफिरीबद्दल मात्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक महिती अशी की,कृपा सदन रोडवरील सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालयाच्या पूर्वीकडील जाधव यांच्या घरालगत पूर्वेच्या पडीक जागेत एक गाभण गाय शनिवारी सायंकाळपासून डिलीवरीविना अडून तडफडत असल्याचे एका महिलेने अंजली होळीकर यांना सकाळी सांगितले. आणि त्यांनी पत्रकार बाळ होळीकर यांना कळविले, त्यानंतर होळीकर यांनी पक्षीमित्र महेबूब चाचा यांना कॉल केला आणि आजारी चाचा सर्व बाजूला सोडून धावत जागेवर आले. पाहतात तर गाय अडून निपचित पडलेली होती. मग चाचांनी जिल्हा पशू सर्व चिकित्सालयाचे डॉ. आर. एल. चव्हाण यांना फोन करुन हा प्रसंग सांगितला. त्यांनी मनपाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यंचा नंबर देवून बोलण्यास सांगितले. पण डॉ. सोनवणे यांनी मी बाहेर आहे, आमच्याकडे व्यवस्था नाही असे सांगत हात झटकले तेव्हा पुन्हा डॉ. चव्हाण यांनी सांगून विनंती केली त्यावर त्यांनी मागे तुम्हाला अनेकदा सहकार्य केलेय, ही मनपाची जबाबदारी आहे असे म्हटले. तेव्हा पत्रकार बाळ होळीकर व चाचा त्यांच्या दुचाकीवरुन एमआयडीसी कॉर्नरला गेले. तिथे डॉ.चव्हाण यांची भेट झाली. दरम्यान मनपा बेवारस जनावरांची जबाबदारी झटकतेय ही बाब जिल्हाधिकार्‍यांच्या लक्षात आणून द्यावी म्हणून जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान गाठले. पण त्यांची भेट झाली नाही. तिथल्या एका कर्मचार्‍याने महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना फोन केला. त्यांनी डॉक्टर चव्हाण मदत करतील असे सांगितले. मग गाईचे बरेवाईट होईल म्हणून चिकित्सालयातून डॉ. चव्हाण यांनी आपले सहकारी परिचर व्ही. पी. राठोड, सेवादाता अभय सोमवंशी यांनी सोबत घेवून मोटारसायकलीवरुन कूच केली. यावेळी गायीसाठी लागणारी औषधे चाचांनी जवळच्या पाचशे रुपयातून खरेदी केली.
तोपर्यंत अकरा वाजत आले होते. गाय तडफडत होती. मोक्यावर जावून पाहणी करत डॉक्टर चव्हाण यांनी सर्वांसह अथक परिश्रम करुन एका तासानंतर अडलेल्या गायीची सुखरुप प्रसुती केली. गायीला गोर्‍हा झाला तोही जीवंत निघाला. तिला सलाईन व इंजेक्शन्स दिले. पाणी पाजले, तेव्हा सर्वांची मेहनत कामी आली असे वाटले. डॉक्टर व सहकारी निघून गेले मग चाचा व शेख यांनी गायीसाठी हिरव्या कडब्याची पेंडी घेतली. गायीचे गर्भाशय बाहेर येवू लागल्याचे बाळ होळीकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पुन्हा चाचांना कॉल केला तेव्हा त्यांनी तिथेच थांबा म्हणत केयूर कामदार यांना सांगून डॉ. अमोल शिंदे यांना बोलावून घेतले. त्यांनी गायीवर उपचार सुरु केले. पण पुन्हा गायीला लागणारी औषधी आणण्यास सांगितले. आढेवेढे न देता परत ती स्वपैशातून घेवून चाचा आले. इकडे पाऊन तासात डॉ.अ मोल शिंदे, बाळ होळीकर यांनी गाईचे गर्भाशय धुवून परत बसविले. टाके घातले. गाय निपचीत पडून होती. आता ती उभी होणे आवश्यक होते. चाचाही आले. थोड्या वेळाने तिला उभी करण्यात यश आले. डॉक्टर आवश्यक त्या सूचना देवून गेले. वासराला थोडे पाजविले. नंतर चार वाजेपर्यंत गर्भाशय परत येवू नये, टाके तुटू नये म्हणून बसू न देणे आवश्यक होते, त्यासाठी परिसरातील पाटील काका, अंजली होळीकर, लहान बालके व एका तरुणाने सहकार्य केले. सायंकाळपर्यत पशुपालक आला नव्हता.


Comments

Top