HOME   लातूर न्यूज

अभाविपकडून राहुल गांधी यांचा निषेध

गांधी चौकात केली निदर्शने, थोरांचा कॉंग्रेसकडून सतत अवमान- आरोप


अभाविपकडून राहुल गांधी यांचा निषेध

लातूर: लातुरच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राहुल गांधी यांचा निषेध केला. राहूल गांधी यांनी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानात ‘भारत बचाव’ यात्रेमध्ये आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. त्यांच्यावर अभद्र टीका केली. याचाच निषेध म्हणून अभाविप लातूर शाखेने राहुल गांधींचा निषेध शहरातील महात्मा गांधी चौक येथे करण्यात आला. कॉंग्रेस व त्यांच्या विद्यार्थी संघटना आतापर्यंत अनेक वेळा वीर सावरकरांचा किंवा थोर महापुरुषांचा अपमान करत आली आहे असा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान आहे, वीर सावरकरांसारख्या अनेक क्रांतीकार्‍यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पणाला लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यावेळी राहुल गांधी मुर्दाबाद, वीर सावरकर जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रांत सह संघटन मंत्री अभिजित पाटील व लातूर जिल्हा प्रमुख जितेंद्र जोशी यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top