लातूर: बाभळगाव जवळील धनेगाव बॅरेजच्या किनार्यावर सापडलेल्या सुटकेसमध्ये एका तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह सापडला. ही सुटकेस तीन चार दिवसांपासून किनार्यावर पडली होती. ग्रामस्थांनी त्याकडे दूर्लक्ष केले. दुर्गंधी वाढल्यानंतर पोलिस पाटलांना पाचारण करण्यात आले. नंतर पोलिसांनी सुटकेस उघडल्यानंतर तरुणीचा मृतदेह आढळला. पुढची कार्यवाही सुरु झाली. ज्या तरुणीचा मृतदेह सापडला तिच्याच वर्णनाची एक महिला लातुरातुन बेपत्ता झाली आहे. या दोन्ही घटनांचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. पोलिसांनी पंचनामा केला आहे. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. बलात्कार करुन खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप या तरुणीची ओळख पटलेली नाही.
Comments