HOME   लातूर न्यूज

फ्लॅग मार्चमध्ये लातूर कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग

केंद्राच्या चुकीच्या धोरणांचा निषेध, कॉंग्रेसच्या विविध सेलचा सहभाग


फ्लॅग मार्चमध्ये लातूर कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग

मुंबई-लातूर: अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सुचनेनुसार काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून ‘भारत बचाओ संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सचिव, माजी राज्यमंत्री, आमदार अमित देशमुख यांनी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी यांच्या समवेत आंदोलनात सहभाग घेतला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरिकत्व कायदा, वाढती महागाई, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना, संकटात सापडलेली भारतीय अर्थव्यवस्थेस जबाबदार केंद्रातील सरकारची चुकीची धोरणे या विरोधात ‘भारत बचाओ संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात लातूर शहरासह जिल्हयातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील विविध सेलचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित राहीले.


Comments

Top