लातूर: चैत्यभूमी हे लाखो लोकांचे श्रद्धा स्थान आहे, या ठिकाणी लाखो लोक येत असतात. शासनामार्फत चैत्यभूमीच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल अशी माहिती नवनिर्वाचित राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबई येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीतील स्मृतीस्थळास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिनाचे समन्वय समितीचे सचिव नागेश काबंळे, भन्ते घम्मप्रियजी, रामराव राठोड, अँड पदमाकर उगिले उपस्थित होते. याप्रसंगी समन्वय समितीच्या वतीने बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. महविकास आघाडी सरकार हे सामान्य कष्टकरी लोकाचे सरकार आहे. महाविकास आघाडीचे सरकार शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक, दलित यांच्यासाठी कार्य करणार आहे. चैत्यभूमीच्या विकासासाठी सरकार आर्थिक तरतूद कमी पडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यभार स्विकारण्याआधी मी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे. अशी भावना बनसोडे यांनी व्यक्त केली.
Comments