लातूर : आज लातुरातील विना अनुदानित शाळांनी बंद पाळला. या शाळातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने चालू असलेल्या शाळा बंद करण्याची विनंती केली. अनेक अनुदानित शाळांनी त्यांना प्रतिसादही दिला. शासनाने २०१४ साली शाळांची तपासणी करुन अनुदानास पात्र शाळा निवडल्या. पहिल्या वर्षी २० टक्के नंतर प्रत्येक वर्षी अनुदानात २० टक्के वाढ करण्याचे सरकारने जाहीर केले होते. सरकारने तपासणी केल्यानुसार पात्र ठरलेल्या शाळांची यादी शिक्षण आयुक्तांकडेच पडून असून ती मंत्रालयापर्यंत गेलीच नाही असे काही संघटनांचे म्हणणे आहे. विना अनुदानित कृती समितीने सांगितल्यानुसार जवळपास ५२ विना अनुदानित शाळा बंद राहिल्या. अनेक अनुदानित शाळात विना अनुदानित तुकड्या असल्याने अनुदानित शाळाही बंदमध्ये सहभागी झाल्या. सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज ५० ते ५५ हजार रुपये पगार मिळायला हवा पण १० हजार रुपयात गुजराण करावी लागते असे एका शिक्षकाने सांगितले.
Comments