HOME   लातूर न्यूज

ट्राफीक पीआय राख यांनी केला होर्डींग हटवण्याचा प्रयत्न

डिजिटल बॅनरमुळे रहदारीत अडथळे, लोकांना सिग्नलच दिसेना!


ट्राफीक पीआय राख यांनी केला होर्डींग हटवण्याचा प्रयत्न

लातूर: लातूर शहरात बोकाळलेल्या पोस्टरबाजीने सगळ्यांचीच डोकेदुखी वाढली आहे. कोठे कोण पोस्टर लावावे याला कसलेही निर्बंध राहिले नाहीत. महानगरपालिकेच्या मोहिमा अधून मधून पोस्टर, बॅनर, होर्डींग्ज हटवतात पण या बाबी पुन्हा बोकाळतात. त्यावर मनपा नियमितपणे लक्ष ठेऊ शकत नाही हे आता सगळ्यांच्याच लक्षात आले आहे. त्याचाच फायदा सगळे घेत असतात. हे प्रसिद्धीचे साहित्य कधी लोंबत असते तर कधी रस्त्यावर पडलेले आढळते. त्याची काळजी लावणाराही घेत नाही. आज तर कहरच झाला. पूर्वीचा अशोक हॉटेल आणि आताच्या लोकमान्य टिळक चौकात लातुरच्या वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख स्वत: उभे होते. लोकांना मार्गदर्शन करीत होते. त्याचवेळी अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांच्या वाढदिवसाचे होर्डींग एका बाजुला झुकले त्यामुळे लोकांना सिग्नल दिसेना. एकमेव जिवंत असलेले सिग्नल तेही लोकांना दिसत नाही म्हटल्यावर राखसाहेब संतप्त झाले. त्यांनी ते स्वत: हटवण्याचा प्रयत्न केला. होर्डींग हटत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सरळ करुन ठेवले. तिथे उभा असलेला ट्राफीक पोलिस मात्र महानगरपालिकेच्या नावाने शिव्या घालत होता.


Comments

Top