लातूर: ‘दशक्रिया’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्याबद्दल लातूर शहरातील पुरोहित ब्राह्मण महासंघाच्या वतीने शुक्रवारी, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. शुक्रवारी प्रदर्शित होत असलेला ‘दशक्रिया’ हा चित्रपट सामाजिक द्वेष पसरवणारा असून जातीय तेढ निर्माण करणारा आहे. या चित्रपटातील अनेक विषय आक्षेपार्ह आहेत. यामध्ये समस्त ब्राम्हण समाजाला लक्ष्य करण्यात आले आहे. याचा निषेध करण्यासाठी लातुरातील ब्राम्हण पुरोहित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी समस्त पुरोहित महासंघाच्या सदस्यांनी सकाळी दहा शिवाजी चौकात एकत्रित यावे, असे आवाहन अखिल भारतीय पुरोहित महासंघाचे जिल्हाध्यक्ष पद्माकर अघोर, पंडित योगेश महाराज चांदोरीकर, सतीश जोशी, वासुदेव कमठाणकर, रामेश्वर रामदासी, प्रशांत धर्मापुरीकर यांनी केले आहे.
Comments