HOME   लातूर न्यूज

पत्रकार मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

दैनिक, साप्ताहिकांच्या तपासणीतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी


पत्रकार मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

लातूर: आज राष्ट्रीय पत्रकार दिनी लातूर येथे पत्रकार, वृत्तपत्रांचे मालक, संपादक यांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरीत अमलबजावणी करावी, पत्रकारांसाठी पेन्शन योजना लागू करावी, जिल्हा दैनिके व साप्ताहिकांच्या तपासणीतील जाचक अटी रद्द कराव्यात, जिल्हा वृत्तपत्रे, विभागीय वृत्तपत्रे, राज्यस्तरीय वृत्तपत्रांच्या जाहिरात दरात सरसकट दर वाढ करावी, मजेठिया आयोगाच्या शिफारसी त्वरीत लागू कराव्यात, प्रासंगिक व प्रसिद्धी मोहिमांच्या जाहिराती क वर्गीय जिल्हा दैनिके व सप्ताहिकांना द्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी अशोक चिंचोले, नपा घोणे, अशोक देडे, बालाजी वागलगावे, मुरलीधर चेंगटे, बाळासाहेब जाधव, रघुनाथ बनसोडे, अशोक हनवते, प्रभाकर शिरुरे, ज्ञानेश्वर सागावे, सोमनाथ स्वामी, संतोष स्वामी उपस्थित होते.


Comments

Top