लातूर : मनपा नगरसेवक तथा युवा उद्योजक शिवकुमार गवळी यांचा वाढदिवस शिवभैय्या मित्र मंडळाच्या माध्यमातून मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून या उपक्रमांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. लातूरच्या औद्योगिक विश्वात नावलौकिक प्राप्त केलेल्या शिवशक्ती स्टील इंडस्ट्रीजचे शिवकुमार गवळी यांची युवा उद्योजक म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. नुकत्याच झालेल्या मनपाच्या निवडणूकीत प्रभाग क्र.११ मधून भाजपाच्या वतीने निवडणूक लढवत मनपा सभागृहात पोहचले. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष लक्ष देणारे शिवकुमार गवळी यांचा वाढदिवस १७ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या वाढदिवसानिमित्त शिवभैय्या मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी ०९ वाजता शासकीय कॉलनी येथे मोफत सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले असून याचे उद्घाटन अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असून प्रभागातील दिपज्योती नगर व श्रीनगर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ ही करण्यात येणार आहे. मित्रमंडळाच्या वतीने विशाल नगर येथील साई मंदिरात महाआरती करण्यात येऊन नगरसेवक शिवकुमार गवळी यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. या विविध उपक्रमांना प्रभागातील नगरसेवकांसह, भाजपाचे पदाधिकारी व प्रभागातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित राहणार आहेत. नगरसेवक शिवकुमार गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांचा लाभ नागरिकांनी मोठया संख्येने घ्यावा व या उपक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवभैय्या मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments