HOME   लातूर न्यूज

कचर्‍यासोबत टायरही जाळतात, चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात

कचरा जाळू नये म्हणून दक्षता पथके नेमण्याची मागणी


कचर्‍यासोबत टायरही जाळतात, चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात

लातूर : लातूर शहरातील कचरा जमवून नेण्याची यंत्रणा कामाला लागली आहे पण अनेक भागात ती नीटपणे रुळली नसल्याने कचरा जाळला जातो. त्यातच थंडीचे दिवस असल्याने आता टायरही जाळले जात आहे. खाडगाव रोडवरून रोज सकाळी कमीत कमी शंभर स्कूल बसेस शाळेतील विद्यार्थ्यांची ने आण करीत असतात. या रस्त्यावर कचरा रस्त्याच्या मधोमध टाकण्याची पद्धत आहे. नियमितपणे त्याला जाळण्याचीही तेथे परंपरा आहे. प्लास्टीक, रबर, टायर काहीही जाळण्यास येथे मागे पुढे पाहिले जात नाही. आज सकाळी येथे टायर जाळले जात होते. शाळेच्या गाडया संथ गतीने जात असताना निष्पाप बालके तो धूर श्वासात भरून मार्गक्रमण करत होती. लातुरच्या एमआयडीसीतही कारखान्यांच्या चिमण्यांमधून निघणार्‍या धुरापेक्षा परिसरात जाळलेल्या कचऱ्याचा धूरच अधिक असतो. जागोजागी साचलेली राख त्याची साक्ष देत असते. हा धूर सगळ्यांसाठीच धोकादायक आहे. मनपाने कचरा गोळा करण्यासाठी यंत्रणा नेमली, उघड्यावर शौचास जाणार्‍यांविरुद्ध गुड मॉर्निंग पथके नेमली, त्याच पद्धतीने कचरा जाळण्यावर निर्बंध घालण्यासाठीही अशी पथके नेमावीत, कचरा जाळणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


Comments

Top