HOME   लातूर न्यूज

जलसंधारण कामांची मंत्र्यांनी केली पाहणी

जलसंधारण कामांसाठी आवश्यक निधी देण्याचे आश्वासन


जलसंधारण कामांची मंत्र्यांनी केली पाहणी

लातूर: औसा तालुक्यातील उजनी येथे तेरणा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणी आणि जलपूजन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. यावेळी जलसंधारणचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, उप अभियंता बी. व्ही. बिराजदार तसेच सरपंच सौ. बेबी नंदा कोपरकर, उपसरपंच गणराज लोखंडे, बाळकृष्ण सोमाणी, शिवराज ओझा आदिसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून भविष्यात पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवणार नाही. याकरिता प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहीजे. तसेच उजनी ग्रामस्थांनी लोकसहभाग, लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेच्या दीड कोटीच्या निधीतून तेरणा नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे ०५ किलो मीटरचे केलेले काम आदर्शवत असे आहे. उजनी नदीच्या खोलीकरणाचे उर्वरीत ०१ किलोमीटरच्या कामांसाठी जलसंधारण विभागाकडून संपूर्ण निधीची उपलब्धता करण्यात येईल. तसेच नदीवरच्या पुलाचे काम व घाटाच्या कामांकरिता प्रयत्न करू, तसेच उजनीच्या ग्रामस्थांनी राज्य शासनाचे जलयुक्त शिवार अभियान सुरू होण्यापुर्वी लोकसहभागातून सुरु केलेल्या नदी खोलीकरणाचे काम इतर गावांसाठी ही प्रेरणादायी असल्याचेही प्रा. शिंदे म्हणाले. उजनी येथील ग्रामस्थांनी जलयुक्त शिवार अभियानपूर्व गावातील लोकांनी एकत्र येऊन तेरणा नदीच्या ०५ किलोमीटरचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम केले आहे. सध्या या नदीपात्रात मोठया प्रमाणावर पाणी साठा असून परिसरातील दोन किलोमीटरपर्यंतच्या शेतीला फायदा झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


Comments

Top