HOME   लातूर न्यूज

प्लास्टिकवर बंदी, लातुरात वाटले पेढे

तीन हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप


प्लास्टिकवर बंदी, लातुरात वाटले पेढे

लातूर: राज्यात प्लास्टिक वापरावर येत्या काळात बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी घेतला. या निर्णयामुळे पर्यावरणाची होणारी हानी टळणार आहे. या निर्णयाबद्दल शुक्रवारी 'वसुंधरा प्रतिष्ठान'च्या वतीने राजीव गांधी चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने लातूर शहरात गेल्या वर्षभरापासून 'प्लास्टिक कॅरीबॅगमुक्त' चळवळ सुरु करण्यात आली आहे. या उपक्रम अंतर्गत शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये तसेच नागरिकांना सुमारे तीन हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप नागरिकांना करण्यात आले. तसेच प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, यामुळे पर्यावरणाची होणारी हानी टळणार आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. यासाठी वसुंधरा प्रतिष्ठान आणखी व्यापक जनजागृती करेल, अशी माहिती वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांनी दिली. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे सहसचिव अमर साखरे, श्रीकांत क्षीरसागर, रामेश्वर बावळे, अविनाश राठोड, योगेश शेळके यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


Comments

Top