लातूर: शेतकर्यांना दिली जाणारी वीज बिले सदोष असून ती दुरुस्त करुन द्यावीत, वापरलेल्याच विजेचे पैसे लावावेत, वीज बिले कमी करुन देण्याची सूचना उर्जामंत्र्यांनी दिली होती त्याचे पालन करावे अशी मागणी आ. त्र्यंबक भिसे यांनी केली आहे. आज त्यांनी शेतकर्यांच्या शिष्टमंडळासह अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
ग्रामीण मतदारसंघात २०११ ते २०१६ या काळात विहीरी, प्रकल्पात पाणीच नव्हते. त्यामुळे शेतीपंप चाललेच नाहीत, वीज न वापरताही शेतकर्यांना बिले आली आहेत. शेतकर्यांना बिलांचे हप्ते पाडून देण्यात आले आहेत पण त्यात मागील बील भरल्याचा उल्लेख नाही, ही देयके मंजूर एचपीपेक्षा जास्तीची देण्यात आली आहेत. ही बिले दुरुस्त व कमी करुन द्यावीत अशी शेतकर्यांची मागणी आहे. या अनुषंगाने चौकशी करुन वापरलेल्या विजेचीच बिले द्यावीत असेही आमदारांनी निवेदनात म्हटले आहे.
Comments