लातूर: संपूर्ण मतदारसंघ माझाच आहे, ग्रामीण आणि शहर या दोन्ही मतदारसंघातून मीसुद्धा इच्छूक आहे. या दोन्हीपैकी कोठूनही आपण विधानसभेची निवडणूक लढवू शकतो असं सांगत कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र शिवाजी पाटील कव्हेकर यांनी सांगितले नाही. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. २० नोव्हेंबरपासून कव्हेकर यांची ग्रामीण भागातील जनतेसाठी जनसंवाद यात्रा सुरु होत आहे. आत्मविश्वास हरवून बसलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या १०० कुटुंबियांच्या भेटी आपण घेणार आहोत, या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेणार आहोत, नैसर्गिक कोप आणि शासनाच्या शेतकरी विरोधा धोरणांमुळे शेती उध्वस्त झाली आहे. कर्जमाफीसाठी अनेक चुकीच्या अटी टाकून सरकारने योजनेचा बट्ट्याबोळ केला, स्वत:चेही हसे करुन घेतले, यामधून येणार्या आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तीन टप्प्यातल्या जनसंवाद यात्रेतून जननायक संघटना गावोगावी पोचवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत असेही कव्हेकरांनी सांगितले.
Comments