लातूर शहरातील कचरा व्यवस्थापन करणार्या गुत्तेदार संस्थेला कामाची बिले देऊ नयेत अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त हंगे यांना सुपूर्त केले आहे. कराराच्या आर्टीकल दोन प्रमाणे आवश्यक असलेला परवाना पडताळून पहावा, तो सर्वांना दाखवावा, जमवलेल्या कचर्याचे वर्गीकरण नियमाप्रमाणे होत नाही, कचरा गोळा करण्यासाठी ४०० कामगार, २५ ट्रॅक्टर, ९० अॅपे वाहनांना जीपीएस सिस्टीम लावायला हवी, लावली असेल तर सर्वांची नावे, आधार कार्ड नंबर द्यावेत, करारानुसार प्रत्येक मजुराला नऊ हजार रुपये मोबदला द्यावा, त्याचे व्हाऊचर्स दाखवावेत, कचरा वर्गीकरण मशिनरी बसवण्यात आलेली नाही, मेकॅनिकल पॉईंट बसवला नाही, खत निर्मितीची व्यवस्था केली नाही आदी अनेक आक्षेप आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहेत. गुत्तेदाराने अटींचे पालन न केल्याने त्यांची बिले काढू नयेत असेही निवेदनात म्हटले आहे.
Comments