रेणापूर: आपण शेतकरी. शेतमजुरांसाठी सदैव प्रयत्नशील असतो. काही नेते मात्र फक्त निवडणुकांपुरते असतात, त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नसते असा आरोप शिआजी पाटील कव्हेकर यांनी केला आहे. सततच्या दुष्काळामुळे व शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. शासनाने उत्पादन खर्चावर आधारीत शेती मालाला भाव द्यावा, शेतकर्यांना पेन्शन सुरू करावी. त्याबरोबरच शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही चुकीची असून सरसकट कर्जमाफी करावी. यासाठीआपण जननायक संघटनेच्या माध्यमातून शासनावर दबाव आणण्याचे काम करणार आहोत असे प्रतिपादनही जननायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
जननायक संघटना लातूर जिल्हा शाखेच्या वतीने २० नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर या कालावधीत ११२ गावात जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ रेणापुर येथील रेणुका देवी मंदीराच्या सभागृहात करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच म. श. हालकुडे हे होते तर माजी जिल्हापरिषद अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कोरे, कार्याध्यक्ष निळकंठ पवार, उपाध्यक्ष सुर्यकांत शेळके, जिल्हा महिला अध्यक्षा वनिता काळे, जिल्हा युवा अध्यक्ष प्रा.मारूती सुर्यवंशी, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब पाटील, चेअरमन अॅड. देविदास कातळे, रेणापूर नगरपंचायतीचे नगरसेवक पदम पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना कव्हेकर म्हणाले की, मी गेली अनेक वर्ष विविध क्षेत्रात तन मन धन अर्पण क रून काम करत आहे. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. काही मंडळी निवडणुकीपुरती जनतेसमोर येतात. त्यांना जनतेशी काही देणेघेणे नसते असा उपरोधिक टोला जिल्हयातील नेत्यांना अप्रत्यक्षरित्या नाव न घेता लगावला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजना राबवण्यात आल्या. सध्या बाजारात शेतमालाला भाव नसल्याने शेतकर्यांची अवस्था बिकट आहे. शासनाने आधारभूत योजना सुरू केली मात्र जाचक अटी लादल्या त्यामुळे शेतकरी खाजगी व्यापार्याकडे शेतमालाची विक्री करत आहे. या व इतर कारणामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शासनाने आत्महत्येची कारणे शोधून सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच शेतकर्यांचे विजबील माफ करून शेती, जीवन आवश्यक वस्तूवरील जीएसटी कर कमी करावा. शेतकर्यांच्या मुलाना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे सांगूनन रेणापुरच्या विकासाचा मास्टर प्लॉन तयार करा त्याला गती देण्याचे काम आम्ही करू अशी ग्वाही कव्हेकर यांनी दिली.
Comments