HOME   लातूर न्यूज

लायन्स क्लबची हाफ मॅरेथॉन स्पर्धा

विजेत्यांना रोख बक्षिसे, १० आणि पाच किलोमीटरची स्पर्धा


लायन्स क्लबची हाफ मॅरेथॉन स्पर्धा

लातूर (आलानेप्र): लॉयन्स क्लब लातूर मिडटाऊनच्या वतीने रविवार, ३१ डिसेंबर २०१७ रोजी २१ किमी., १० किमी व ५ किमी. अंतराच्या हाफ मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'ग्रीन लातूर-रन लातूर' या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा घेण्यात येत आहे. लॉयन्स क्लबच्या वतीने मागील वर्षापासून मिनी मॅराथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. मागच्या वर्षी महिला व पुरूषांसाठी १० किमी. तसेच मुला- मुलींसाठी ०४ किलोमीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत दीड हजारहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या २१ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेतील स्त्री - पुरुष स्पर्धकांना प्रत्येकी ५१ ह्जार रूपयांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे. दुसर्‍या क्रमांकाला ३१ हजार, तृतीय २१ हजार तर उत्तेजनार्थ प्रत्येकी ७ व ५ हजारांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. २१ किमी. अंतराच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क व्यक्तीगत एक हजार रू., तीन व्यक्ती असल्यास प्रत्येकी ९०० रू. व ३१ पेक्षा अधिक नोंदी केल्यास प्रत्येकी ८०० रूपये नोंदणी शुल्क भरावा लागेल. या स्पर्धेत १८ वर्षापुढील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. नोंदणी केलेल्या स्पर्धकांना २१ व १० किमी. स्पर्धेसाठी एक टी शर्ट, एक छोटी बॅग, जीपीएस नियंत्रित बिब चिप दिली जाणार आहे. तर पाच कि. मी. अंतराच्या स्पर्धकांना एक टी शर्ट, एक लहान बॅग व रूट मॅप उपलब्ध करून दिला जाणार आहे. सर्व स्पर्धकांना संयोजकांतर्फे नाश्ता, शक्तीवर्धक पेय व पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येईल. स्पर्धकांना नोंदणी किट ३० डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाळासाहेब रेड्डी, अनिरूध्द कुर्डूकर, अजय गोजमगुंडे, धनंजय बेंबडे, डॉ . दत्तात्रय मंदाडे आदींनी केले आहे.


Comments

Top