HOME   टॉप स्टोरी

आधी चार दिवसाला, मग दोन दिवसाला नंतर रोजच पाणी देऊ!

स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे यांची ग्वाही, दिलेला शब्द पूर्ण करु


लातूर: आम्ही निवडणुकीत शब्द दिला होता त्या प्रमाणे लातुरकरांना पाणी पुरवणार आहोत. मेकॅनिकलचं टेंडर मंजूर झाल्यानंअतर काही दिवस चार दिवसाला, नंतर दोन दिवसाला आणि मग एक दिवसाला पाणी देऊ अशी ग्वाही मनपाच्या स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी दिली. आधीच्या स्थायी समितीनं काय केलं आणि तुम्ही काय करणार या प्रश्नावरील मुलाखतीत ते बोलत होते.
आधीच्या स्थायी समितीत अनेक विषय चर्चेत आले, त्यातून काही ठराव मंजूर झाले, काही प्रलंबित पडले तर काही नाकारले गेले. आता राहिलेल्या कामांची जबाबदारी माझ्यावर आहे. मनपाच्या कामांवर अंकुश ठेऊन हा गाडा नीट हाकणं हे स्थायी समितीचं काम आहे. आधीच्या सभापतींनी चांगली कामे केली. त्यात काही त्रुटी राहून गेल्या, काही कामे राहून गेली ती आम्ही पूर्ण करुन घेऊ. अमृत योजनेतलं मेकॅनिकलचं एक मोठं टेंडर आहे. मागचे सभापती ते मंजूर करण्यास तयार नव्हते, तरीही त्याला मंजुरी मिळाली पण तांत्रिक कारणांमुळे ते रद्द करावं करावं लागलं. ते आता पुन्हा काढण्यात आलं आहे. मंजुरीनंतर दोन महिन्यात आम्ही शहरवासियांना चार दिवसांना, नंतर दोन दिवसांना आणि पुढे दररोज पाणी देऊ. मलनि:सारणाचंही मोठं काम बाकी आहे. त्यासाठी १२९ कोटी रुपयांचा निधी आला आहे. ते टेंडर मंजूर झाल्यास मलनि:सारणाचं महत्वाचं काम मार्गी लागेल असा विश्वास गोजमगुंडे यांनी व्यक्त केला.


Comments

Top