HOME   टॉप स्टोरी

रितेश देशमुख यांनी मागितली माफी

मेघडंबरीत बसून, शिवरायांच्या पुतळ्याकडे पाठ करुन काढली छायाचित्रे, टिकेची झोड


रितेश देशमुख यांनी मागितली माफी

रायगड: स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीत बसून, शिवरायांच्या पुतळ्याकडे पाठ करुन फोटो सेशन केलं. एवढंच नव्हे तर ही छायाचित्रं सोशल मिडियावरही टाकली. छत्रपतींवर चित्रपट काढणार्‍या रितेशच्या या ‘प्रतापा’मुळं सबंध महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. जे काही केलं ते भक्तीभावानं केलं. कुणाला दुखवायचा आमचा हेतू नव्हता. कुणी दुखावले असल्यास अंत:करणापासून माफी मागतो असा माफीनामाही प्रसंग ओळखून रितेशने काढला आहे. सर्वात महान गोष्ट म्हणजे रितेशसोबत थोर इतिहासकार विश्वास पाटीलही सहभागी असल्याचे छायाचित्रात दिसतात!
रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव, पानिपतकार विश्वास पाटील काल रायडावर गेले होते. रितेश शिवरायांवर चित्रपट काढतोय याची त्याला पार्श्वभूमी असावी. या दृष्टीने त्यांनी रायगडाची पाहणीही केली. नंतर तिथल्या राजदरबारातील मेघडंबरीतील शिवरायांच्या पुतळ्या शेजारी बसून फोटो काढले, मेघडंबरीत न चढता किमान शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजुला उभे राहून फोटो काढता आले असते पण तसे झाले नाही. आपल्या पाठीमागे थोर व्यक्तीचा पुतळा आहे याचे भानही त्यांना नव्हते असे सर्वांच्या मुद्राभावावरुन वाटते. त्यांनी हे काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यामुळे प्रचंड टीका सुरु झाली. झालेला प्रकार लक्षात येताच रितेश देशमुख यांने माफी मागितली.


Comments

Top